लेवीय 7 MARIRV
लेवीय Chapter 7 MARIRV Bible Verse Images
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Please remember to give attribution to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. when using IRV-Marathi Bible Verse images. You can use CC-licensed materials as long as you follow the license conditions. One condition of all CC licenses is attribution.
Creative Commons License
- Title: Indian Revised Version (IRV) Marathi - 2019
- Creator: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS)
- Source: Digital Bible Library
- License: CC BY-SA 4.0
Terms of Use: This work is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. It is attributed to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS), and the Unified Scripture XML (USX) format version can be found on the Digital Bible Library website. All IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).
In addition, we would like to give very special thanks to eBible.org for making the Marathi Indian Revised Version Bible available in MySQL format.
Square Portrait Landscape 4K UHD
दोषार्पणाविषयीचा विधी असा आहे: हे अर्पण परमपवित्र आहे.
Square Portrait Landscape 4K UHD
ज्या स्थानी होमबलीचा वध करावयाचा त्याच स्थानी दोषार्पणाच्या बलीचा वध करावा, आणि याजकाने त्या बलीचे रक्त वेदीवर सभोवती टाकावे.
Square Portrait Landscape 4K UHD
त्याची सर्व चरबी त्याने अर्पावी; त्याचे चरबीदार शेपूट, आतड्यावरील चरबी,
Square Portrait Landscape 4K UHD
दोन्ही गुरदे, त्याच्यावरील कमरेजवळील चरबी व गुरद्यापर्यंतचा काळजावरील चरबीचा पडदा वेगळे करावेत.
Square Portrait Landscape 4K UHD
या सर्वांचा याजकाने होम करावा; हे परमेश्वरासाठी होमार्पण आहे. हेच दोषार्पण होय.
Square Portrait Landscape 4K UHD
याजक वर्गातील प्रत्येक पुरुषाला हे दोषार्पण बली खाण्याचा हक्क आहे; ते परमपवित्र आहे, ते पवित्र स्थानी बसून खावे.
Square Portrait Landscape 4K UHD
दोषार्पण पापार्पणासारखेच आहे; त्या दोघांचे विधी एकच आहेत; जो याजक ह्याच्याद्वारे प्रायश्चित करील त्याचा त्या अर्पणावर हक्क आहे.
Square Portrait Landscape 4K UHD
प्रायश्चित करणाऱ्या याजकाचा त्या होमार्पणाच्या बलीच्या कातड्यावरही हक्क असेल.
Square Portrait Landscape 4K UHD
भट्टीत भाजलेले कढईत किंवा तव्यावर तळलेले सर्व अन्नार्पण, ते अर्पण करणाऱ्या याजकाचे होईल.
Square Portrait Landscape 4K UHD
प्रत्येक अन्नार्पण तेल मिश्रित किंवा कोरडे, ते अर्पण करणाऱ्या अहरोनाच्या मुलांचे आहे; त्या सर्वाचा त्यांच्यावर सारखाच हक्क आहे.
Square Portrait Landscape 4K UHD
परमेश्वरासाठी कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याचा विधी असा:
Square Portrait Landscape 4K UHD
त्यास तो शांत्यर्पणाचा यज्ञ उपकारस्तुतीसाठी करावयाचा असेल तर त्याने तेलात मळलेल्या, बेखमीर पोळ्या, तेल लावलेल्या बेखमीर चपात्या आणि तेलात मळलेल्या सपिठाच्या तळलेल्या पोळया उपकारस्तुतीच्या यज्ञासोबत अर्पाव्या.
Square Portrait Landscape 4K UHD
त्याच्या उपकारस्तुतीच्या शांत्यर्पणाच्या यज्ञासोबत त्याने खमिर घातलेल्या भाकरीही अर्पाव्या
Square Portrait Landscape 4K UHD
या प्रत्येक अर्पणातून परमेश्वरासाठी प्रत्येकी एक पोळी अर्पावी; शांत्यर्पणाचे रक्त शिंपडणाऱ्या याजकाचा त्या पोळीवर हक्क आहे.
Square Portrait Landscape 4K UHD
त्याने उपकारस्तुतीसाठी केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे मांस, अर्पण करण्याच्या दिवशीच खावे; त्यातील काही सकाळपर्यंत ठेवू नये.
Square Portrait Landscape 4K UHD
यज्ञबलीचे अर्पण नवसाचे किंवा स्वखुशीचे असेल तर ज्या दिवशी तो ते अर्पील त्यादिवशीच त्याने ते खावे आणि जर त्यातून काही उरेल तर त्याने दुसऱ्या दिवशीही खावे.
Square Portrait Landscape 4K UHD
त्या यज्ञबलीचे काही मांस तिसऱ्या दिवसापर्यंत उरले तर ते अग्नीत जाळूत टाकावे.
Square Portrait Landscape 4K UHD
जर कोणी शांत्यर्पणाच्या यज्ञबलीच्या मांसातून तिसऱ्या दिवशी मांस खाईल तर परमेश्वरास ते आवडणार नाही, व तो ते अर्पण मान्य करणार नाही; ते अर्पण अमंगळ होईल; त्या पापाबद्दल भोगाव्या लागणाऱ्या शिक्षेस तो स्वत: जबाबदार राहील.
Square Portrait Landscape 4K UHD
ज्या मांसास कोणत्याही अशुद्ध वस्तूचा स्पर्श झाला असेल ते खाऊ नये; ते अग्नीत जाळून टाकावे. शुद्ध असणाऱ्यानेच यज्ञबलीचे मांस खावे;
Square Portrait Landscape 4K UHD
परंतु जर कोणी अशुद्ध असून परमेश्वरास अर्पिलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे मांस खाईल तर त्यास आपल्या लोकांतून बाहेर काढावे.
Square Portrait Landscape 4K UHD
एखादा मनुष्य जर एखाद्या अशुद्ध वस्तुला स्पर्श करेल मग ती अशुद्धता मनुष्याची, पशूची किंवा दुसऱ्या कोणत्या अमंगळ पदार्थाची असो, तर तो अशुद्ध होईल आणि परमेश्वरास अर्पण केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे जर तो मांस खाईल तर त्यास आपल्या लोकांतून बाहेर काढावे.
Square Portrait Landscape 4K UHD
सर्व इस्राएल लोकांस असे सांग: तुम्ही बैलाची मेंढराची किंवा बकऱ्याची चरबी खाऊ नये.
Square Portrait Landscape 4K UHD
मरण पावलेल्या जनावराची चरबी किंवा इतर पशूंनी फाडून टाकलेल्या जनावराची चरबी तुम्ही इतर कामासाठी वापरावी पण ती मुळीच खाऊ नये.
Square Portrait Landscape 4K UHD
परमेश्वरास होमाद्ववारे अर्पिलेल्या पशूची चरबी जर कोणी खाईल तर त्यास आपल्या लोकांतून बाहेर काढावे
Square Portrait Landscape 4K UHD
“तुम्ही कोठेही राहत असला तरी आपल्या घरात पक्ष्याचे किंवा जनावराचे रक्त तुम्ही कधीही खाऊ नये.
Square Portrait Landscape 4K UHD
जर कोणी कोणतेही रक्त खाईल तर त्यास आपल्या लोकांतून बाहेर काढावे.”
Square Portrait Landscape 4K UHD
“इस्राएल लोकांस असे सांग: जर कोणी परमेश्वरासमोर आपल्या शांत्यर्पणाचा यज्ञबली अर्पील तर त्याने त्या अर्पणातून काही भाग परमेश्वराकडे आणावा.
Square Portrait Landscape 4K UHD
त्याने आपल्या हाताने परमेश्वरासाठी अर्पणे आणावी; त्याने चरबी व ऊर याजकाकडे आणावा; ते ऊर परमेश्वरासमोर ओवाळले जाईल; हे ओवाळणीचे अर्पण होय.
Square Portrait Landscape 4K UHD
मग याजकाने त्या चरबीचा होम करावा परंतु ऊर अहरोन व त्याचे पुत्र ह्यांचा होईल.
Square Portrait Landscape 4K UHD
तसेच तुम्ही आपल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीची उजवी मांडीही समर्पित केलेला अंश म्हणून याजकाला द्यावी.
Square Portrait Landscape 4K UHD
अहरोनाच्या मुलांपैकी जो कोणी शांत्यर्पणाचे रक्त व चरबी अर्पील त्याचा त्या मांडीवर हक्क असावा.
Square Portrait Landscape 4K UHD
मी परमेश्वर इस्राएल लोकांच्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीतून ओवाळणीचा ऊर व उजवी मांडी काढून घेऊन अहरोन याजक व त्याचे पुत्र ह्याना दिली आहे; हा इस्राएल लोकांकडून त्यांना मिळणारा नेहमीचा हिस्सा आहे. इस्राएल लोकांनी हा निरंतरचा विधी म्हणून पिढ्यानपिढया पाळावा.”
Square Portrait Landscape 4K UHD
परमेश्वराकरिता अर्पिलेल्या अर्पणातून हे भाग अहरोन व त्याचे पुत्र ह्यांना देण्यात आलेले आहेत; जेव्हा जेव्हा ते याजक म्हणून परमेश्वराची सेवा करतात तेव्हा तेव्हा त्या समर्पणातून ते भाग त्यांना मिळावेत. देवाची सेवा करणारे याजक म्हणून ज्या दिवशी त्यांची नेमणूक करण्यात आली त्याच दिवसापासून असे ठरले आहे.
Square Portrait Landscape 4K UHD
परमेश्वराने ज्या दिवशी त्यांना अभिषेक केला त्यादिवशी त्याने इस्राएल लोकांकडून हा भाग त्यांना मिळावा अशी आज्ञा दिली व हा त्यांचा पिढ्यानपिढ्या कायमचा हक्क ठरला आहे.
Square Portrait Landscape 4K UHD
हे विधी होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण, याजकाच्या समर्पणाच्या वेळचे अर्पण आणि शांत्यर्पण या विषयीचे आहे;
Square Portrait Landscape 4K UHD
इस्राएल लोकांनी परमेश्वराकरिता काय अर्पणे आणावीत या विषयी त्याने त्यांना सीनाय रानात आज्ञा दिली त्यावेळी त्याने मोशेला ह्याप्रमाणे सीनाय पर्वतावर हे विधी लावून दिले.
Available Bible Translations
Leviticus 7 (ASV) »
Leviticus 7 (KJV) »
Leviticus 7 (GW) »
Leviticus 7 (BSB) »
Leviticus 7 (WEB) »
Lévitique 7 (LSG) »
Levitikus 7 (LUTH1912) »
लैव्यव्यवस्था 7 (HINIRV) »
ਅਹਬਾਰ 7 (PANIRV) »
লেবীয়া 7 (BENIRV) »
லேவியராகமம் 7 (TAMIRV) »
లేవీకాండం 7 (TELIRV) »
લેવીય 7 (GUJIRV) »
ಯಾಜಕಕಾಂಡ 7 (KANIRV) »
اَللَّاوِيِّينَ 7 (AVD) »
ויקרא 7 (HEB) »
Levítico 7 (BSL) »
Lê-vi 7 (VIE) »
Levítico 7 (RVA) »
Levitico 7 (RIV) »
利 未 记 7 (CUVS) »
利 未 記 7 (CUVT) »
Levitiku 7 (ALB) »
3 Mosebok 7 (SV1917) »
Левит 7 (RUSV) »
Левит 7 (UKR) »
3 Mózes 7 (KAR) »
Левит 7 (BULG) »
レビ記 7 (JPN) »
3 Mosebok 7 (NORSK) »