प्रेषितांचीं कृत्यें Chapter 27 MARIRV Bible Verse Images

प्रेषितांचीं कृत्यें 27 Bible Verse Pictures. Choose from a large collection of inspirational, motivational and encouraging Bible verses with pictures of nature. Download and share प्रेषितांचीं कृत्यें 27 inspirational Bible verse images. Bible verse pictures were created based on verses from the Indian Revised Version (IRV) - Marathi. IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Please remember to give attribution to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. when using IRV-Marathi Bible Verse images. You can use CC-licensed materials as long as you follow the license conditions. One condition of all CC licenses is attribution.

Creative Commons License

Terms of Use: This work is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. It is attributed to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS), and the Unified Scripture XML (USX) format version can be found on the Digital Bible Library website. All IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

In addition, we would like to give very special thanks to eBible.org for making the Marathi Indian Revised Version Bible available in MySQL format.


प्रेषितांचीं कृत्यें 27:1 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जेव्हा आम्ही समुद्रमार्गे इटलीला जाण्याचे ठरवले तेव्हा पौल व इतर काही कैद्यांना युल्य नावाच्या शताधिपतीच्या हाती सोपविण्यात आले, युल्य हा अगस्तस सेनेचा एक अधिकारी होता.

प्रेषितांचीं कृत्यें 27:2 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
अद्रमुत्तिय येथील एका जहाजातून आम्ही जाणार होतो, हे जहाज आशियाच्या किनाऱ्यावरील बंदरे घेत पुढे जाणार होते, आम्ही या जहाजातून प्रवासास निघालो, तेव्हा मासेदोनियातील थेस्सलनीका येथे राहणारा अरिस्तार्ख आमच्याबरोबर होता.

प्रेषितांचीं कृत्यें 27:3 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
दुसऱ्या दिवशी आम्ही सिदोन नगराला पोहचलो, युल्य पौलाशी फार चांगला वागला, पौलाच्या मित्रांना त्याची काळजी घेता यावी म्हणून त्याने मोकळीक दिली.

प्रेषितांचीं कृत्यें 27:4 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेथून आम्ही समुद्रमार्गे पुढे निघालो आणि कुप्रच्या किनाऱ्याकिनाऱ्याने निघालो कारण वारा समोरचा होता.

प्रेषितांचीं कृत्यें 27:5 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
किलकिया व पंफुलिया प्रांताजवळच्या समुद्राला पार करून लुक्या प्रांतातील मुर्या बंदरात पोहचलो.

प्रेषितांचीं कृत्यें 27:6 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेथे शताधिपतीला इटलीला जाणारे आलेक्सांद्रीयाचे एक जहाज आढळले, त्याने आम्हास त्या जहजात बसविले.

प्रेषितांचीं कृत्यें 27:7 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आम्ही बरेच दिवस हळूहळू प्रवास करीत होतो, कनिदा शहरापर्यंत येण्यासाठी आम्हास फार कष्ट पडले कारण वारा तोंडचा होता, आम्हास पुढे जाता येईना, म्हणून आम्ही क्रेताच्या दक्षिणेकडून सलमोन शहराच्याच्या समोरच्या बाजूस गेलो.

प्रेषितांचीं कृत्यें 27:8 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
यापुढे आमचे जहाज क्रेत बेटाच्या किनाऱ्याने मोठ्या अडचणीतून सुरक्षित बंदर येथे पोहोचले, तेथे जवळच लसया नगर होते.

प्रेषितांचीं कृत्यें 27:9 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
बराच वेळ वाया गेला होता आणि पुढील प्रवास करणे बरेच अवघड झाले होते, कारण एव्हाना यहूद्यांच्या उपासाचा काळही निघून गेला होता, तेव्हा पौलाने त्यांना सावधानतेचा इशारा दिला, पौल म्हणाला,

प्रेषितांचीं कृत्यें 27:10 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
“पुरुषांनो, मला वाटते, आपल्या प्रवासात जहाजातील मालाला आणि जहाजालाच नव्हे तर आपल्या जीवालाही धोका होईल.”

प्रेषितांचीं कृत्यें 27:11 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परंतु पौलाच्या मताशी जहाजाचा कप्तान व मालक सहमत झाले नाहीत, उलट जहाजाच्या कप्तानाच्या व मालकाच्या बोलण्यावरच शताधिपतीचा जास्त विश्वास होता.

प्रेषितांचीं कृत्यें 27:12 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परंतु हे सुरक्षित म्हंटलेले बंदर हिवाळ्यात मुक्काम करायला सोईचे नव्हते, म्हणून बहुमताने पुढे निघावे असे ठरले आणि फेनिकेला जाण्याचा प्रयत्न करावा आणि शक्य झाले तर तेथेच हिवाळा घालवावा असे ठरले.

प्रेषितांचीं कृत्यें 27:13 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा दक्षिणेकडून मंद वारे वाहू लागले, तेव्हा ते नांगर उचलून क्रेताच्या किनाऱ्याकिनाऱ्याने तारू हाकारीत जाऊ लागले, जहाजावरच्या लोकांस वाटू लागले की, अशाच प्रकारचे वारे आम्हास पाहिजे होते व तसेच ते वाहत आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 27:14 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परंतु लवकरच क्रेत बेटावरून ‘ईशान्येचे’ म्हंटलेले वादळी वारे वाहू लागले.

प्रेषितांचीं कृत्यें 27:15 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणि जहाज वादळी वाऱ्यात सापडले व त्यास पुढे जाता येईना, तेव्हा पुढे जाण्याचा प्रयत्न सोडून आम्ही वाऱ्याने जहाज भरकटू दिले.

प्रेषितांचीं कृत्यें 27:16 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग कौदा नावाच्या लहानशा बेटाच्या किनाऱ्याकिनाऱ्याने आम्ही जाऊ लागलो, मग थोड्या खटपटीनंतर जीवन रक्षक होडीवर उचलून घेतली.

प्रेषितांचीं कृत्यें 27:17 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जीवन रक्षक होडी आत घेतल्यावर लोकांनी जहाज दोरखंडाने आवळून बांधले, जहाज वाळू असलेल्या सूर्ती नावाच्या उथळ जागी आदळेल या भीतीने त्यांनी शीड खाली काढले, तेव्हा वाऱ्याने ते भरकटू लागले.

प्रेषितांचीं कृत्यें 27:18 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जोरदार वादळी वाऱ्याचे तडाखे खावे लागल्याने लोकांनी दुसऱ्या दिवशी जहाजावरील सामान बाहेर टाकून दिले.

प्रेषितांचीं कृत्यें 27:19 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तिसऱ्या दिवशी जहाजाची काही सामग्री त्यांनी आपल्या हातांनी बाहेर काढून टाकली.

प्रेषितांचीं कृत्यें 27:20 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
बरेच दिवस आम्हास सूर्य किंवा तारे दिसले नाहीत, वादळ फारच भयंकर होते, आम्ही आमच्या तरण्याची सर्व आशा सोडून दिली, आम्ही मरणार असे आम्हास वाटू लागले.

प्रेषितांचीं कृत्यें 27:21 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
बराच काळपर्यंत लोकांस उपवास घडल्यावर, मग पौल त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, “गुहस्थांनो, क्रेतावरून मुक्काम हलवू नका, हा माझा सल्ला तुम्ही ऐकायला पाहिजे होता, म्हणजे हा त्रास व ही हानी तुम्हास टाळता आली असती.”

प्रेषितांचीं कृत्यें 27:22 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पण आता तुम्ही धीर धरावा अशी माझी विनंती आहे, कारण तुमच्यापैकी एकाच्याही जीवाला धोका पोहोंचणार नाही, आपले जहाज मात्र गमवावे लागेल.

प्रेषितांचीं कृत्यें 27:23 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मी ज्या देवाचा सेवक आहे आणि ज्याची उपासना मी करतो, त्याचा दूत काल रात्री माझ्या बाजूला उभा राहीला.

प्रेषितांचीं कृत्यें 27:24 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणि तो दूत म्हणाला, “पौला भिऊ नको! तुला कैसरापुढे उभे राहिलेच पाहिजे, तुझ्याबरोबर प्रवास करणारे सर्व लोक देवाने त्याच्या दयेने तुला दिले आहेत.

प्रेषितांचीं कृत्यें 27:25 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा गृहस्थांनो, तुम्ही सर्व धीर धरा! कारण मला जसे देवाने सांगितले, अगदी तसे होणार असा मला विश्वास आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 27:26 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परंतु आपणास एखाद्या बेटावर उतरून थांबावे लागले.”

प्रेषितांचीं कृत्यें 27:27 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
चौदाव्या रात्री आमचे जहाज अद्रिया समुद्रातून चालले होते, तेव्हा खलाशांनी जहाज एखाद्या भूमीजवळ पोहोचले असावे असा अंदाज केला.

प्रेषितांचीं कृत्यें 27:28 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्यांनी पाण्याची खोली मोजली तेव्हा ती चाळीस मीटर भरली, आणखी काही वेळाने त्यांनी परत एकदा समुद्राची खोली मोजली तेव्हा ती तीस मीटर भरली.

प्रेषितांचीं कृत्यें 27:29 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ओबडधोबड खडकाळ जागेवर आपले जहाज आदळेल अशी भीती वाटल्याने त्यांनी चार नांगर जहाजाच्या मागील बाजूने टाकले आणि दिवस उजाडण्याची प्रार्थना करीत वाट पाहू लागले.

प्रेषितांचीं कृत्यें 27:30 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
खलाशांनी जहाजातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांनी जहाजाच्या पुढील भागातून नांगर टाकल्याचे भासवून जीवन रक्षक होड्या समुद्रात टाकल्या.

प्रेषितांचीं कृत्यें 27:31 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परंतु पौल शताधिपतीला व इतर शिपायांना म्हणाला, “जर हे लोक जहाजात राहणार नाहीत, तर तुम्ही वाचणार नाही.”

प्रेषितांचीं कृत्यें 27:32 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
यावर शिपायांनी जीवन रक्षक होड्यांचे दोर कापून टाकले आणि त्याखाली पाण्यात पडू दिल्या.

प्रेषितांचीं कृत्यें 27:33 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पहाट होण्याअगोदर पौलाने त्या सर्वांना काहीतरी खाण्याचा आग्रह केला, तो म्हणाला, “आज चौदावा दिवस आहे, तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात पण खाणेपिणे काही केले नाही, अन्नाचा कणही खाल्ला नाही.

प्रेषितांचीं कृत्यें 27:34 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तुम्ही थोडे तरी खा, कारण तुमचा टिकाव लागण्यासाठी तुम्ही खाणे जरुरीचे आहे, तुम्ही खावे अशी मी तुम्हास विनंती करतो, तुमच्यापैकी कोणाच्या केसासही धक्का लागणार नाही.”

प्रेषितांचीं कृत्यें 27:35 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
असे बोलल्यानंतर पौलाने भाकर घेतली आणि सर्वांच्या समक्ष देवाचे उपकार मानले, ती भाकर मोडून तो खाऊ लागला.

प्रेषितांचीं कृत्यें 27:36 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ते पाहून त्या सर्वांना धीर आला आणि ते जेवले.

प्रेषितांचीं कृत्यें 27:37 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आम्ही सर्व मिळून जहाजात दोनशे शहात्तर लोक होतो.

प्रेषितांचीं कृत्यें 27:38 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्या सर्वांनी पुरेसे खाल्ल्या प्याल्यानंतर धान्य समुद्रात टाकून दिले आणि जहाजातील भार कमी केला.

प्रेषितांचीं कृत्यें 27:39 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
दिवस उजाडल्यावर त्यांना भूभागाची ओळख पटली नाही, परंतु तेथे किनारा असलेल्या उपसागरासारखी ती जागा दिसून आली, म्हणून शक्य झाल्यास तेथील किनाऱ्याला जहाज लावण्याचे त्यांनी ठरवले.

प्रेषितांचीं कृत्यें 27:40 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
म्हणून त्यांनी नांगर कापले आणि समुद्रात पडू दिले, त्याचबरोबर सुकाणूंच्या दोऱ्या एकत्र केल्या, नंतर त्यांनी जहाजाच्या पुढच्या भागाचे शीड वारा भरावे म्हणून उभे केले आणि जहाज किनाऱ्याला आणले.

प्रेषितांचीं कृत्यें 27:41 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परंतु दोन समुद्रांमधील वर आलेल्या वाळूच्या ढिगावर जहाज जोराने आदळले, तेव्हा जहाजाची पुढची बाजू वाळूमध्ये रुतून बसली आणि गलबताचा मागचा भाग लाटांच्या तडाख्यामुळे तुटू लागला.

प्रेषितांचीं कृत्यें 27:42 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा शिपायांनी कैद्यांना मारण्याचे ठरवले, यासाठी की त्यांच्यातील कोणी पोहोत जाऊन पळू नये.

प्रेषितांचीं कृत्यें 27:43 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परंतु शताधिपतीला पौलाला वाचवायचे होते म्हणून त्याने शिपायांना तो विचार सोडून देण्यास सांगितले आणि ज्यांना पोहता येत असेल त्यांनी जहाजातून उड्या टाकून किनाऱ्याला जावे अशी आज्ञा केली.

प्रेषितांचीं कृत्यें 27:44 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
बाकीच्या लोकांनी फळ्यांच्या अगर जहाजाच्या तुटलेल्या लाकडांच्या आधारे भूमी गाठावी असे सांगितले, अशा रीतीने जहाजातील सर्वजण सुखरुपपणे भूमीवर पोहोचले.

Available Bible Translations

American Standard Version
Acts 27 (ASV) »
King James Version
Acts 27 (KJV) »
GOD’S WORD® (GW)
Acts 27 (GW) »
Berean Bible
Acts 27 (BSB) »
World English Bible
Acts 27 (WEB) »
Louis Segond 1910
Actes 27 (LSG) »
इंडियन रिवाइज्ड वर्जन - हिंदी
प्रेरितों के काम 27 (HINIRV) »
ਭਾਰਤੀ ਸੋਧਿਆ ਹੋਇਆ ਸੰਸਕਰਣ - ਪੰਜਾਬੀ
ਰਸੂਲਾਂ ਦੇ ਕਰਤੱਬ 27 (PANIRV) »
ভারতীয় সংশোধিত সংস্করণ - বাংলা
पশিষ্যচরিত 27 (BENIRV) »
இந்தியன் ரீவைஸ்டு வேர்ஷன் - தமிழ்
அப்போஸ்தலருடைய நடபடிகள் 27 (TAMIRV) »
ఇండియన్ రేవిజ్డ్ వెర్షన్ - తెలుగు
అపొస్తలుల కార్యములు 27 (TELIRV) »
ઇન્ડિયન રિવાયઝ્ડ વર્ઝન - ગુજરાતી
પ્રેરિતોનાં ક્રત્યો 27 (GUJIRV) »
ಭಾರತೀಯ ಪರಿಷ್ಕೃತ ಆವೃತ್ತಿ - ಕನ್ನಡ
ಅಪೊಸ್ತಲರ ಕೃತ್ಯಗಳು 27 (KANIRV) »
الكتاب المقدس باللغة العربية، فان دايك
أَعْمَالُ ٱلرُّسُلِ 27 (AVD) »
תנ ך עברי מודרני
מעשי השליחים 27 (HEB) »
Bíblia Sagrada Português
Atos 27 (BSL) »
Kinh Thánh: Tiếng Việt
Công Vụ Các Sứ đồ 27 (VIE) »
Reina Valera Antigua
Hechos 27 (RVA) »
La Sacra Bibbia
Atti 27 (RIV) »
圣 经 简体中文和合本
使 徒 行 传 27 (CUVS) »
聖 經 繁體中文和合本
使 徒 行 傳 27 (CUVT) »
Библия на русском
Деяния 27 (RUSV) »
Українська Біблія
Дії 27 (UKR) »
Szent Biblia - Magyar
Apostolok 27 (KAR) »
Българска Библия
Деяния 27 (BULG) »
De Heilige Schrift
Handelingen 27 (NLD) »

प्रेषितांचीं कृत्यें (MARIRV) Chapter Selection

MARIRV Book Selection List