मत्तय 10 MARIRV
मत्तय Chapter 10 MARIRV Bible Verse Images
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Please remember to give attribution to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. when using IRV-Marathi Bible Verse images. You can use CC-licensed materials as long as you follow the license conditions. One condition of all CC licenses is attribution.
Creative Commons License
- Title: Indian Revised Version (IRV) Marathi - 2019
- Creator: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS)
- Source: Digital Bible Library
- License: CC BY-SA 4.0
Terms of Use: This work is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. It is attributed to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS), and the Unified Scripture XML (USX) format version can be found on the Digital Bible Library website. All IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).
In addition, we would like to give very special thanks to eBible.org for making the Marathi Indian Revised Version Bible available in MySQL format.
Square Portrait Landscape 4K UHD
येशूने आपल्या बारा शिष्यांना आपल्याजवळ एकत्र बोलावले आणि त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यांवर प्रभुत्त्व दिले व तसेच त्या अशुद्ध आत्म्यांना घालवण्यासाठी, प्रत्येक प्रकारचे आजार व प्रत्येक प्रकारचे व्याधी बरे करण्यासाठी अधिकार दिला.
Square Portrait Landscape 4K UHD
तर त्या बारा प्रेषितांची नावे ही होती: पेत्र (ज्याला शिमोन म्हणत) आणि त्याचा भाऊ अंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान
Square Portrait Landscape 4K UHD
फिलिप्प व बर्थलमय, थोमा आणि मत्तय जकातदार, अल्फीचा मुलगा याकोब व तद्दय
Square Portrait Landscape 4K UHD
शिमोन कनानी व पुढे ज्याने त्याचा विश्वासघात केला तो यहूदा इस्कार्योत.
Square Portrait Landscape 4K UHD
येशूने या बाराजणांना अशी आज्ञा देऊन पाठवले की: परराष्ट्रीय लोकांमध्ये जाऊ नका व शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका.
Square Portrait Landscape 4K UHD
तर त्याऐवजी इस्राएलाच्या हरवलेल्या मेंढराकडे जा.
Square Portrait Landscape 4K UHD
तुम्ही जाल तेव्हा संदेश द्या व असे म्हणा, “स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”
Square Portrait Landscape 4K UHD
रोग्यांना बरे करा, मरण पावलेल्यांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा आणि भूते काढा. तुम्हास फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या.
Square Portrait Landscape 4K UHD
तुमच्या कमरेला सोने, चांदी किंवा तांबे घेऊ नका.
Square Portrait Landscape 4K UHD
सोबत पिशवी घेऊ नका, तुमच्या प्रवासासाठी फक्त तुमचे अंगावरचे कपडे व पायातील वहाणा असू द्या. अधिकचे वस्त्र किंवा वहाणा घेऊ नका. काठी घेऊ नका, कारण कामकऱ्याला आपले अन्न मिळणे आवश्यक आहे.
Square Portrait Landscape 4K UHD
ज्या कोणत्याही नगरात किंवा गावात तुम्ही जाल तेथे कोण योग्य व्यक्ती आहे याचा शोध करा आणि तेथून निघेपर्यंत त्या व्यक्तीच्या घरी राहा.
Square Portrait Landscape 4K UHD
त्या घरात प्रवेश करतेवेळी येथे शांती असो, असे म्हणा.
Square Portrait Landscape 4K UHD
जर ते घर खरोखर योग्य असेल तर तुमची शांती तेथे राहील पण जर ते घर योग्य नसेल तर तुमची शांती तुमच्याकडे परत येईल.
Square Portrait Landscape 4K UHD
आणि जो कोणी तुम्हास स्वीकारणार नाही किंवा तुमचे शब्द ऐकणार नाही तेव्हा त्याच्या घरातून किंवा नगरातून बाहेर पडताना तुम्ही आपल्या पायाची धूळ झटकून टाका.
Square Portrait Landscape 4K UHD
मी तुम्हास खरे सांगतो. न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम आणि गमोराला अधिक सोपे जाईल.
Square Portrait Landscape 4K UHD
लांडग्यांमध्ये जसे मेंढरास पाठवावे तसे मी तुम्हास पाठवत आहे, म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा.
Square Portrait Landscape 4K UHD
मनुष्यांविषयी सावध असा कारण ते तुम्हास न्यायसभेच्या स्वाधीन करतील आणि त्यांच्या सभास्थानामध्ये ते तुम्हास फटके मारतील.
Square Portrait Landscape 4K UHD
माझ्यामुळे ते तुम्हास राज्यपाल व राजे यांच्यासमोर आणतील. तुम्ही त्यांच्यापुढे व परराष्ट्रीय लोकांपुढे माझ्याविषयी सांगाल.
Square Portrait Landscape 4K UHD
जेव्हा तुम्हास अटक करतील तेव्हा काय बोलावे किंवा कसे बोलावे याविषयी काळजी करू नका. तेव्हा तुम्ही काय बोलायचे ते तुम्हाला सांगितले जाईल.
Square Portrait Landscape 4K UHD
कारण बोलणारे तुम्ही नसून तुमच्या देवाचा आत्मा तुमच्याद्वारे बोलेल.
Square Portrait Landscape 4K UHD
भाऊ आपल्या भावाविरूद्ध व पिता आपल्या मुलाविरूद्ध उठेल आणि त्यास विश्वासघाताने मारण्यास सोपवून देईल. मुले आईवडिलांवर उठून त्यांना जिवे मारण्यास देतील.
Square Portrait Landscape 4K UHD
माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील. पण शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल.
Square Portrait Landscape 4K UHD
एका ठिकाणी जर तुम्हास त्रास दिला जाईल, तर दुसरीकडे जा. मी तुम्हास खरे सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलच्या सर्व गावामध्ये तुमचे असे फिरणे संपणार नाही.
Square Portrait Landscape 4K UHD
शिष्य त्याच्या गुरूपेक्षा वरचढ नाही किंवा चाकर मालकाच्या वरचढ नाही.
Square Portrait Landscape 4K UHD
शिष्य आपल्या शिक्षकासारखा व चाकर आपल्या मालकासारखा होणे इतके पुरे. जर घराच्या धन्याला त्यांनी बालजबूलम्हणले तर घरातील इतर मनुष्यांना ते किती वाईट नावे ठेवतील! लोकांचे नको तर देवाचे भय बाळगा.
Square Portrait Landscape 4K UHD
म्हणून त्यांना भिऊ नका, कारण उघडे होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही.
Square Portrait Landscape 4K UHD
जे मी तुम्हास अंधारात सांगतो ते तुम्ही प्रकाशात बोला आणि कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते तुम्ही छतावरून गाजवा.
Square Portrait Landscape 4K UHD
जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्यास भ्या.
Square Portrait Landscape 4K UHD
दोन चिमण्या एका नाण्याला विकत नाहीत काय? तरीही तुमच्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेशिवाय त्यातील एकही जमिनीवर पडणार नाही.
Square Portrait Landscape 4K UHD
आणि तुमच्या डोक्यावरचे केससुद्धा त्याने मोजलेले आहेत.
Square Portrait Landscape 4K UHD
म्हणून घाबरु नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही अधिक मौल्यवान आहात.
Square Portrait Landscape 4K UHD
जो कोणी मनुष्यांसमोर मला स्वीकारील त्यास मीसुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर स्वीकारीन.
Square Portrait Landscape 4K UHD
पण जो कोणी मनुष्यांसमोर मला नाकारील त्यास मीसुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन.
Square Portrait Landscape 4K UHD
असे समजू नका की मी पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करायला आलो आहे. मी शांतता स्थापित करायला आलो नाही तर तलवार चालवायला आलो आहे.
Square Portrait Landscape 4K UHD
मी फूट पाडायला आलो आहे, म्हणजे मुलाला त्याच्या पित्याविरुद्ध आणि मुलीला तिच्या आईविरुद्ध, सुनेला तिच्या सासूविरुद्ध उभे करायला आलो आहे.
Square Portrait Landscape 4K UHD
सारांश, मनुष्याच्या घरचीच माणसे त्याचे शत्रू होतील.
Square Portrait Landscape 4K UHD
जो माझ्यापेक्षा स्वतःच्या पित्यावर किंवा आईवर अधिक प्रीती करतो, तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर, मुलीवर अधिक प्रीती करतो, तो मला योग्य नाही.
Square Portrait Landscape 4K UHD
जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येण्याचे नाकारतो, तो मला योग्य नाही.
Square Portrait Landscape 4K UHD
जो आपला जीव मिळवतो तो त्यास गमवील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावतो तो त्यास मिळवील.
Square Portrait Landscape 4K UHD
जी व्यक्ती तुम्हास स्वीकारते ती व्यक्ती मला स्वीकारते आणि ज्या पित्याने मला पाठवले त्यालाही स्वीकारते.
Square Portrait Landscape 4K UHD
जो कोणी संदेष्ट्यांचा स्वीकार त्याच्या संदेशाच्या सेवेमुळे करतो, त्यास संदेष्ट्याचे प्रतिफळ मिळेल आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्यास नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल.
Square Portrait Landscape 4K UHD
मी तुम्हास खरे सांगतो की, या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी प्यालाभर थंड पाणी प्यायला देईल तोही आपल्या प्रतिफळाला मुळीच मुकणार नाही.
Available Bible Translations
Matthew 10 (ASV) »
Matthew 10 (KJV) »
Matthew 10 (GW) »
Matthew 10 (BSB) »
Matthew 10 (WEB) »
Matthieu 10 (LSG) »
Matthäus 10 (LUTH1912) »
मत्ती 10 (HINIRV) »
ਮੱਤੀ 10 (PANIRV) »
মথি 10 (BENIRV) »
மத்தேயு 10 (TAMIRV) »
మత్తయి 10 (TELIRV) »
માથ્થી 10 (GUJIRV) »
ಮತ್ತಾಯನು 10 (KANIRV) »
مَتَّى 10 (AVD) »
הבשורה על־פי מתי 10 (HEB) »
Mateus 10 (BSL) »
Ma-thi-ơ 10 (VIE) »
Mateo 10 (RVA) »
Matteo 10 (RIV) »
马 太 福 音 10 (CUVS) »
馬 太 福 音 10 (CUVT) »
Mateu 10 (ALB) »
Matteus 10 (SV1917) »
Матфея 10 (RUSV) »
Матвія 10 (UKR) »
Máté 10 (KAR) »
Матей 10 (BULG) »
マタイによる福音書 10 (JPN) »
Matteus 10 (NORSK) »
Mathayo 10 (SWHULB) »
Mateusza 10 (POLUBG) »
Matayos 10 (SOM) »
Mattheüs 10 (NLD) »
Matthæus 10 (DA1871) »